Share

MNS | “वारसा मैदानाचा नसतो…”; मनसेची उद्धव ठाकरेंना कोपरखिळी

Published On: 

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी दादरमधील शिवाजी पार्क कोणाला मिळणार?, यावरून शिंदे गटात आणि ठाकरे गटात चढाओढ सुरू होती. मात्र काल या रेसला अखेर पूर्णविराम मिळाला. काल उच्च न्यायालयात यासंबंधी सुनावणी पार पडली. न्यायालयाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. निकाल जाहीर होताच उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्ती केली. त्यावरून मनसे पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे ?

वारसा मैदानाचा नसतो विचाराचा असतो, असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कोपरखिळी मारली आहे. यासंदर्भात संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे.

 

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य –

दसरा मेळावा ही आपली परंपरा आहे. शिवसैनिक आणि शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी दसरा मेळाव्यासाठी उत्साहात, गुलाल उधळत वाजत गाजत या, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते.

तसेच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक आवाहन देखील दिलं आहे. ते म्हणाले, दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण या परंपरेला कुठेही गालबोट लागेल असं काहीही करु नका.
महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!