🕒 1 min read
निरोगी राहण्यासाठी आहारात मीठ, साखर आणि तेल योग्य प्रमाणात घ्यावे. या अशा गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या जेवणात वापर केला जातो, परंतु लोकांना हे माहित नाही की एका दिवसात साखर, मीठ आणि तेल किती प्रमाणात खावे. या तीन गोष्टी अनेक रोगांचे मूळ आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना याबाबत सतर्क केले आहे. त्यामुळे अनेक देशांनी बाजारात विकल्या जाणार्या मीठ, साखर आणि तेलामध्ये असणाऱ्या फॅटच्या प्रमाणावर निर्बंधी घातली आहे. परंतु, भारतात अजूनही असे अनेक खाद्यपदार्थ आहेत ज्यात तेल,साखर आणि मीठ यांचे प्रमाण खूप जास्त वापरले जाते. हे पदार्थ आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.
एका दिवसात मीठ, साखर आणि तेल किती खावे
WHO च्या मते, आपण एका दिवसात 5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये. बहुतेक भारतीय यापेक्षा कितीतरी जास्त मीठ खातात. एका दिवसात 6-8 चमचे साखर आणि 4 चमच्यापेक्षा जास्त तेल खाऊ नये.
जास्त मीठ, साखर आणि तेलाने आरोग्य बिघडवते
मीठ, तेल किंवा साखरेचा अतिप्रमाणात वापर केल्यास त्यातून अनेक प्रकारचे आजार उद्भवू लागतात. या गोष्टींमुळे हृदय, किडनी आणि मधुमेह सारखे आजार खूप लवकर होतात. बदलती जीवनशैली, आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे या समस्या वाढत आहेत. आहारातील मीठ, तेल, साखरेचे प्रमाण कमी केल्यास लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार दूर होतात.
मीठ जास्त धोकादायक आहे
बाजारात मिळणाऱ्या पदार्थांचा वापर काही काळापासून झपाट्याने वाढला आहे. बाजारात मिळणाऱ्या या खाद्यपदार्थांमध्ये खूप प्रमाणात मीठ असते. फ्राइड नट्स आणि बटाट्याच्या वेफर्समध्ये मीठ भरपूर असते. याशिवाय नूडल्स, सॉस आणि पॅकेट सूप हेही आरोग्यासाठी हानिकारक आहेत. जास्त मीठ आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे रक्तदाब वाढतो जो हृदयासाठी धोकादायक असतो. उच्च सोडियम पातळी रोगांचा धोका वाढवते.
महत्वाच्या बातम्या
- PNB Kisan Yojana | शेतीशी संबंधित प्रत्येक गरज आता होईल पूर्ण,शेतकऱ्यांच्या ‘या’ बँक अकाऊंट मध्ये होणार 50,000 रुपये जमा
- Shambhuraj Desai | राष्ट्रवादीतील अनेक लोक आमच्या संपर्कात ; शंभूराज देसाई यांचा मोठा दावा
- Supriya Sule | सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीतला फोटो मॉर्फ केलेला, FACT CHECK
- MNS | “वारसा मैदानाचा नसतो…”; मनसेची उद्धव ठाकरेंना कोपरखिळी
- Sheetal Mhatre | “सुप्रिया सुळे देखील बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत”, शीतल म्हात्रेंचा आरोप
- Electric Car Update | ‘ही’ सोलर इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये गाठते 1,600 किमी अंतर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
