🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे गटातील नेत्या शीतल म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्विट करत त्यांच्यावर देखील आरोप केले होते. शेअर केलेल्या फोटो मध्ये सुप्रिया सुळे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीत बसलेल्या पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या बाजूला माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे बसल्याचं दिसत आहेत. मात्र हा फोटो शिंदे गटाने माॅर्फ केला असल्याचं समोर आलं आहे.
शिंदे गटाने सुप्रिया सुळे यांचा फोटो केला माॅर्फः
युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार यांनी ट्विट करत पुरावा दिला आहे. प्रविण यांनी माॅर्फ केलेला ओरिजनल फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची रिकामी आहे मात्र बाजूला राजेश टोपे आणि अनिल देशमुख आहेत. यावेळी वाण नाही ते गुण लागला असा टोला प्रविण यांनी लगावला आहे. तसेच प्रविण यांनी आॅनलाईन गुन्हा देखील तक्रार केली आहे.
पाहा ट्विटः
वाण नाही पण गुण लागला ????♂️
शिंदेसेना भाजपच्या नादाला लागून आता फोटोशॉप सेना झाली आहे.
हा घ्या पुरावा ???? https://t.co/1ZiAKIAeyA pic.twitter.com/9gN1mVoZL6
— Pravinkumar Biradar ???? (@PravinIYC) September 23, 2022
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्र्यांचे खुर्चीत बसले असतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली होती. त्यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी शिंदे गटाने हा फोटो माॅर्फ केला होता. मात्र, हा फोटो फेक असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहे.
श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकाः
दरम्यान, श्रीकांत शिंदे यांच्या फोटोवरुन अनेकजण राज्य सरकारवर टीका करताना दिसत आहेत. हे छायाचित्र वर्षा बंगल्यावरच टिपण्यात आलेले आहे किंवा नाही, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र, फोटो व्हायरल होताच विरोधकांनी शिंदेंना धारेवर धरलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- MNS | “वारसा मैदानाचा नसतो…”; मनसेची उद्धव ठाकरेंना कोपरखिळी
- Sheetal Mhatre | “सुप्रिया सुळे देखील बसल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत”, शीतल म्हात्रेंचा आरोप
- Electric Car Update | ‘ही’ सोलर इलेक्ट्रिक कार एका चार्जमध्ये गाठते 1,600 किमी अंतर
- MNS vs Shivsena | दसरा मेळाव्याला परवानगी मिळाल्यानंतर मनसेचे उद्धव ठाकरेंना मोठे आव्हान!
- Atul Bhatkhalkar | गृहमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या विधानावर भातखळकरांचा खोचक टोला म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
