औरंगाबाद : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सत्ताधारी नेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये आरोप, टीकेबाजीचे प्रमाण वाढलं असल्याचं दिसून येतं आहे. यामध्ये भाजप पक्षाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना पक्षामध्ये वेगळीच खेळी सध्या सुरू आहे. नारायण राणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच नारायण राणेंनी दोन दिवसांपूर्वी एक पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली होती. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे नेते आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणेंवर हल्ला केला आहे.
काय म्हणाले चंद्रकांत खैरे ?
उद्धव ठाकरे यांच्याविषयी उलट-सुलट बोलाल तर याद राखा. तुमची शुगर आधीच वाढली आहे. ती अजून वाढू देऊ नका,असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी नारायण राणे यांना एकप्रकारे इशाराच दिला आहे. आज औरंगाबाद शहर युवासेना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संमारंभ होता. त्यावेळी खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
आम्ही मग काहीही बोलू –
मी स्पष्टपणे सांगतो, जास्त बोलायचं नाही. मातोश्रीनं, शिवसेनाप्रमुखांच्या कुटुंबानं तुम्हाला मोठं केलं. काय होते तुम्ही याचा विचार करा. आता तुम्ही जर मोठे झाले असाल, तर कुणामुळे झालात हे लक्षात ठेवा. यानंतर जास्त काही बोलू नका. तुम्ही वाईट बोललात तर आम्ही शिवसैनिकच आहोत. मग आम्ही काहीही बोलू, असं खैरेंनी सांगितलं आहे.
नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवरील टीका –
दरम्यान, आता हे म्हणतात आम्ही अमित शहांना ‘आसमान’ दाखवू. उद्धव ठाकरे असं कोणाच्या जीवावर म्हणत आहेत?. शिवसेनेचा जन्म 19 जून 1966 रोजी झाला. तेव्हा उद्धव ठाकरे केवळ सहा वर्षांचे होते. तेव्हापासून शिवसेना मराठी माणूस आणि हिंदुत्वासाठी संघर्ष करत होती. त्यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते, असं नारायण राणेंनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray । “दसरा मेळाव्याला उत्साहानं या पण…”; उद्धव ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन
- Sushma Andhare । कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण कोण करतेय?, सुषमा अंधारे यांनी स्पष्टच सांगितलं
- Upcoming Cars | या नवरात्रीला बाजारात दाखल होणार आहेत ‘या’ शानदार कार, जाणून घ्या!
- Travelling Tips | तुम्ही पहिल्यांदाच विमानाने प्रवास करणार असाल तर या टिप्स वापरून पहा, प्रवास होईल सोपा!
- Nitesh Rane | “मला वाटलं आदित्यच लग्न मुलीशी जमलं म्हणून…” ; नितेश राणेंचा खोचक टोला


