मुंबई : मुंबई महानगरपालिका शिवसेनाच जिंकणार असं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. तसेच “आदित्य ठाकरे दिल्लीपर्यंत घोडदौड करणार आहेत त्यामुळे आत्ताच त्यांना रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भाजपामध्ये जे पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहतात त्यांचं काय होतं हे आपण पाहिलेला आहे” असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. पेडणेकर यांनी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही निशाणा साधला आहे.
यावेळी किशोरी पेडणेकर यांनी नितेश राणे आणि भाजपचा चांगलाच समाचार घेतला. भरत गोगावले तुम्हाला आठ माळ्यावरच्या मातोश्रीवर कोणी बोलावलं नाही. आणि तुम्ही येऊ ही नका. नितेश राणे रात्रीचे पत्र लिहितात का? स्वतःच्या बापाचे ऐकत नाही. असं पेडणेकर म्हणले. सगळ्या बाजूंनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात रान पेटवले जात आहे. मात्र, मी तुम्हाला आज सांगते, की मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच जिंकणार आहेत. तुम्ही अनेक पक्ष फिरुन येणार आणि नंतर ज्या पक्षात राहणार त्यांच्यासाठी गळे काढणार, असा टोला पेडणेकर यांनी राणे कुटुंबीयांना लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Bharat Gogawale | ‘युवराजांची दिशा चुकली’ घोषणेचा नेमका अर्थ भरत गोगावले यांनी केला स्पष्ट
- Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरभरती संदर्भात केली ‘ही’ मोठी घोषणा
- Amar Deshmukh | जसे पहिल्या मुख्यमंत्र्यांकडे बडवे होते तसे या मुख्यमंत्र्यांकडे पण बडवे आहेत- अमर देशमुख
- Udhhav Thackeray | तो शपथविधी यशस्वी झाला असता तर ते सुद्धा ओके होतं- उद्धव ठाकरे
- Shivsena । संजय राऊत बेडरपणे ईडीला सामोरे गेले, ते मऱ्हाटी बाण्याने लढले, पण वाकले नाहीत; शिवसेनेची राऊतांवर स्तुतीसुमने


