Share

Udhhav Thackeray | तो शपथविधी यशस्वी झाला असता तर ते सुद्धा ओके होतं- उद्धव ठाकरे

Published On: 

मुंबई  : सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपाची खेळी सुरू असते. अशातच पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधला आहे. भाजप पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेत् अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधी वरुन भाजपला टोला लगावला आहे.

पहाटेचा शपथविधी चोरुन केला नाही-

भाजप सत्तेसाठी वाटेल ते करते असंं सांगताना उद्धव ठाकरे यांनी पहाटच्या शपथविधीची तुलना स्वत: शिवतिर्थवर घेतलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेशी केली. ते म्हणाले की, आम्ही ती सोयरीक अधिकृत जुळवली, चोरुन मारुन पहाटेचा शपथविधी नव्हता केला. तो शपथविधी यशस्वी झाला असता तर ते सुद्धा ओके होतं. ‘मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम पार पडला. त्यावळी ठाकरे बोलत होते.

तुम्ही शिंपडलं तर ते गटाराचं पाणी-

परंतू केवळ आपल्यासोबत बसले तर नाही नाही हे केवढं मोठं पाप आहे, अशी भाजपची भूमिका आहे. आमच्याकडे शिंपडलं तर काय गंगाजल आहे आणि तुम्ही शिंपडलं तर ते गटाराचं पाणी असल्याचंही ठाकरे यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, आम्ही जे करतो ते जनतेच्या समोर करतो-

तसेच, आम्ही काय वाटेल ते करु पण तुम्ही नाही करायचं. आम्ही वाटेल ते करतच नाही. आम्ही जे करतो ते जनतेच्या समोर करतो, त्यांच्या साक्षीने करतो. म्हणूनच मी शपथविधीचा कार्यक्रम शिवतिर्थावर केला. सर्वांसमोर शपथ घेतली. चोरुन नाही, असं म्हणत ठाकरे यांनी भाजपला चांगलंच फटकारलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!