🕒 1 min read
Nitesh Rane | सातारा : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. “माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही”, असंते म्हणालेत. यावर स्पष्टीकरण देत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“मी 2014 पासून दोनदा माझ्या मतदारसंघांमध्ये निवडून आलो आहे. माझ्या जनतेला मी अधिकारवाणीने बोलू शकतो तसे माझं त्यांच्याशी नाते आहे. माझ्या लोकांना माझ्या बोलण्याची पद्धत आवडते म्हणून मला त्यांनी निवडून दिले आहे. माझ्या विरोधकांना ती धमकी वाटली गेली कारण त्यांना राणेंनी ऍलर्जी आहे“, असं म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
दरम्यान, नितेश राणेंच्या वक्तव्याबाबत एकनाथ शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ (Sanjay Shirsath) यांनी नितेश राणे यांना सुनावलं आहे. ते म्हणाले, “नितेश राणे आता मोठे नेते होण्याच्या मार्गावर आहेत. ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक राजकारण असतं. तिथं धमकी देणं योग्य नाही. आपण लोकांना जिंकायचं असतं. आपण लोकांना आपलसं करायचं असतं. तर ग्रामपंचयात आपोआप येते. अशा कुणाला दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात.”
नितेश राणेंचं वक्तव्य काय?
नितेश राणे म्हणाले, “चुकून पण इथे माझ्या विचाराचा सरपंच आला नाही, तर मी एकही रुपयाचा निधी देणार नाही. ऐवढी काळजी मी निश्चितपणे घेईल. त्यामुळे मतदान करताना आता नीट विचार करा, कारण आता निधी वाटप माझ्या हातात आहे. जिल्हा नियोजन समितीचा निधी असो, ग्रामविकासचा निधी असो की 25 पंधराचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, कारण मी सत्तेत असलेला आमदार आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Rohit Pawar | “मी राज ठाकरेंच्या ओरिजनल स्टाईलचा फॅन, मात्र…”; रोहित पवारांचा खोचक टोला
- Amit Shah | काँग्रेसने चीनी दूतावासाकडून १.३५ कोटी घेतले, अमित शाह यांचा आरोप
- Eknath Shinde | “दमदाट्या देऊन ग्रामपंचायत आणायच्या नसतात”; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा नितेश राणेंना सल्ला
- Sushma Andhare | “रामभाऊ, आमचा नाद करू नका, आम्ही मागच्या मागे माणूस आऊट करतो”; सुषमा अंधारेंची तुफान फटकेबाजी
- Hair Care Tips | केसांची वाढ सुधारायची असेल, तर आहारात करा ‘या’ गोष्टींचा समावेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

