Share

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरभरती संदर्भात केली ‘ही’ मोठी घोषणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काल 25 ऑगस्ट रोजी गुरुवारी संध्याकाळी मराठा आरक्षण व अन्य मागण्यांच्या बाबतीत बोलण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात मराठा समाजाच्या संघटनांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. त्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नोकरभरती संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.

एकनाथ शिंदे उमेदवारांना तात्काळ नियुक्ती-

राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या 1 हजार 64 उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

मराठा आरक्षण घेऊन उमेदवार शासन सेवेत रुजू-

साधारणपणे 2 हजार 185 उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर 1 हजार 064  उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल, असं शिंदे म्हणाले आहेत.

तसेच, या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येणार असून उर्वरित 702 उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी,त्याचबरोबर विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल,असं देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाच्या सम्यांसाठी उपसमिती स्थापन करणार-

पुढे शिंदे म्हणाले की, येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि ‘सारथी’ या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!