🕒 1 min read
मुंबई : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांना मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (१२ एप्रिल) हायकोर्टाकडून मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावर आता भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नितेश राणे म्हणाले की,‘हे होणारच होते. कारण महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून या लोकांना तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे. कोणत्या ना कोणत्या खोट्या केसेस भाजपच्या नेत्यांवर टाकायच्या आणि नंतर न्यायालयासमोर तोंडावर आपटायचे. ही त्यांची रोजची सवय झाली आहे.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की, ‘खोट्या केसेस टाकल्यानंतर न्यायालयात त्यांना जे काही बोलल्या जाते त्यानंतर त्यांना तोंड पण दाखवण्याची जागा राहत नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून बोलतोय कि प्रविण दरेकर अतिशय पारदर्शक पद्धतीने आपले काम करत आहेत. पण आता काय यांना तोंडावर आपटण्याची आणि लोकांचे शिव्या-शाप घेण्याची सवय झाली आहे. म्हणून या प्रकरणावरून तरी त्यांनी काही तरी बोध घ्यावा’, असे राणे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या –
- “जनतेचे पैसै हडपणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची…”, राष्ट्र्वादीची टीका
- मुंबै बँक घोटाळ्याप्रकरणी दरेकरांना दिलासा; अटकपूर्व जामीन मंजूर
- “सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला
- “सेव्ह विक्रांतचा निधी भाजपच्या खात्यात जमा”; किरीट सोमय्यांच्या वकिलाकडून गौप्यस्फोट
- “… पूरस्काराने मोदींचा बहुमान वाढला आणि पुरस्काराचाही”, प्रवीण दरेकरांचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
