Share

“सेटिंग करण्याचा प्रयत्न केला पण पप्पू…”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना टोला

Published On: 

मुंबई: आयएनएस विक्रांत घोटाळयाप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामिनासाठी किरीट सोमय्या यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर त्यांच्या वकिलाने पैसे जमा करण्यासाठी राजभवनात कुठलेही खाते नसल्याने सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेला निधी पक्षाला दिला असल्याचा युक्तिवाद केला आहे. तर यानंतर आज सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत आपण या विरोधात हायकोर्टात जाणार असल्याचे म्हटले आहे. यावरूनच संजय राऊत (sanjay raut) यांनी सोमय्यांवर टीका केली आहे.

“सेटिंगचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला, मात्र पप्पू नापास झाला. आता सेटिंगच्या गोष्टी वरच्या न्यायालयात सुरू आहे. पण सत्य मेव जयते!”, असे ट्वीट करत संजय राऊत यांनी सोमय्यांना डिवचले आहे. दरम्यान सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमेच्या नावाखाली किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांनी गोळा केलेल्या वर्गणीचे पैसे लाटल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. तर आजच सोमय्या यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

किरीट सोमय्या यांनी ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. “सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिमे अंतर्गत फक्त ११ कोटी जमा करण्यात आले होते. १० डिसेंबर २०१३ साली आम्ही सेव्ह आयएनएस विक्रांत मोहिम राबवली. मात्र आज १० वर्षांनंतर संजय राऊत म्हणत आहेत की, ५८ कोटी जमा झाले. यापूर्वीही संजय राऊत यांनी ७ आरोप केले आहेत. मात्र एकाचाही पुरावा मुंबई पोलिसांकडे नाही. १७ डिसेंबर २०१३ साली जेव्हा आपण राष्ट्रपती यांना भेटलो तेव्हा शिवसेना नेते गोपीनाथ मुंडेही सोबत होते. त्यामुळे ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणे बंद होणार नाही. आम्ही या विरोधात हायकोर्टात जाणार.”, असा इशारा किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“जनतेचे पैसै हडपणारे भाजप नेते कोणावर कारवाई होणार याची…”, राष्ट्र्वादीची टीका

‘विक्रांत’साठी जमले फक्त ११ हजार रुपये; किरीट सोमय्यांचा दावा

सोमय्या बेपत्ता : “आम्ही केंद्राला विचारू की तुमची सुरक्षा…”, गृहमंत्र्यांचे टीकास्त्र

“…म्हणून मी काश्मीर फाईल्स पाहिला नाही”; सोनू निगमचा खुलासा

“११ हजार की ५८ कोटी याचा तपास…”, सोमय्यांच्या खुलास्यानंतर राऊतांचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!