मुंबई: भाजप आमदार नितेश राणे हे सध्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आज त्यांनी विधानभवनामध्ये माध्यमांशी बोलताना मुंबई महापालिकेवर निशाणा साधला आहे. “मुंबईतील २-३ घरांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई महापालिका चालवली जात आहे”, असा आरोप त्यांनी या वेळी केला. तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या घरावरील अनधिकृत बांधकामाप्रकरणी न्यायालयाने दिलासा दिल्याबद्दल त्यांनी न्यायालयाचे आभार देखील मानले आहेत.
“आज सत्याचा विजय झालेला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर सूड बुद्धीने कारवाई होत होती. त्याला न्यायालयाने चांगलीच चपराक दिली आहे.” असे नितेश राणे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

