Share

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर; ६.५ कोटी मोजलेला ‘प्रमुख’ खेळाडू ७ एप्रिलला होणार फिट!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ पूर्वी अनेक संघांचे प्रमुख खेळाडू दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहेत आणि त्यापैकी एक संघ दिल्ली कॅपिटल्स हा आहे. दिल्लीचा आघाडीचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया आयपीएलमध्ये केव्हा खेळणार याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, आता नॉर्कियाच्या उपलब्धतेबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तंदुरुस्त होईल.

क्रिकबझशी बोलताना दिल्ली कॅपिटल्सच्या अधिकाऱ्याने सांगितले, की नॉर्किया संघाच्या तिसऱ्या सामन्यात भाग घेणार आहे. म्हणजेच ७ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो खेळताना दिसणार आहे. नॉर्किया नुकताच मुंबईत पोहोचला असून संघात येण्यापूर्वी तो क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे.

दिल्लीचा संघ नॉर्कियावर जास्त अवलंबून आहे आणि त्यामुळेच त्यांनी कागिसो रबाडाला रिटेन न करता ६.५ कोटींची रक्कम देऊन नॉर्कियाला कायम ठेवले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने नॉर्कियाच्या दुखापतीबद्दल कोणताही खुलासा केलेला नाही पण गेल्या काही महिन्यांपासून तो एकही सामना खेळलेला नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ –

पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अश्विन हेब्बर, टीम सेफर्ट, रोवमन पॉवेल, मनदीप सिंग, डेव्हिड वॉर्नर, केएस भरत, अक्षर पटेल, ललित यादव, कमलेश नागरकोटी, मिचेल मार्श, रिपल पटेल, यश धुल, विकी ओस्तवाल, प्रवीण दुबे, सरफराज खान, एनरिक नॉर्किया, शार्दुल ठाकूर, लुंगी एनगिडी, खलील अहमद, चेतन साकारिया, मुस्तफिजुर रहमान, कुलदीप यादव.

महत्त्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!