मुंबई : ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सोशल मीडियावर सातत्यानं कौतुक होत आहे. तसाच चित्रपटाला विरोधदेखील होत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने 11 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 167 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. सध्या सोशल मीडियावर फक्त याच चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटावरून एका IAS अधिकाऱ्याने ट्विट केलं आहे आणि चित्रपटाची कमाई दान करावी, असा खोचक सल्ला दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना दिला आहे. त्यांच्या ट्विटला विवेक अग्निहोत्री यांनी उत्तरही दिलं आहे.
IAS अधिकाऱ्याने काय म्हटलं?
मध्य प्रदेशातले आयएएस अधिकारी नियाज खान यांनी ट्विट केलं, की, “काश्मीर फाइल्सची कमाई 150 कोटींवर पोहोचली आहे. खूप छान. काश्मिरी ब्राह्मणांच्या भावनांचा जनतेने खूप आदर केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी या काश्मिरी ब्राह्मणांच्या मुलांचं शिक्षण आणि त्यांच्यासाठी घरं बांधण्याकरिता सर्व कमाई दान करावी, हे खूप मोठं पुण्याचं काम असेल. त्यांनी असं केल्यास चित्रपट निर्मात्याबद्दल माझ्या मनात आदर वाढेल.
“दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटला प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे, की “सर नियाझ खान साहेब, मी 25 तारखेला भोपाळला येत आहे. तुम्ही भेटीसाठी वेळ द्या, जेणेकरून आपण भेटू आणि विचारांची देवाणघेवाण करू शकू. तुम्ही तुमच्या पुस्तकांची रॉयल्टी आणि आयएएस अधिकारी म्हणून काय आणि कशी मदत करू शकता, याबद्दल चर्चा करू शकू.” विवेक अग्निहोत्री यांच्या या हजरजबाबीपणाचं नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :


