अमरावती: हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेले आहे. भाजप आणि शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. आता शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. कीर्तिकर हे शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने अमरावतीच्या दौऱ्यावर आहेत. “आम्ही बाळासाहेबांकडून हिंदुत्वाचे बाळकडू घेतले आहे आणि त्यामध्ये तसूभरही मागे सरलेलो नाही”, असे ते यावेळी म्हणाले.
भाजपने मेहबूबा मुफ्तीबरोबर सरकार बनवलं होत हे सांगत असतानाच त्यांनी “हिंदुत्वासाठी भाजप काय करते? असा सवाल देखील उपस्थित केला. स्थानिक स्वराज्य संस्थेत काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना यांची आघाडी राहणार का याबाबत निवडणूक लागल्यावर निर्णय घेतला जाईल असे वक्तव्य कीर्तिकर यांनी यावेळी केले.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

