Share

“भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” अमेय खोपकरांचे ट्विट; मिटकरींचे सडेतोड उत्तर, म्हणाले, “लढाया वाघास…”

Published On: 

मुंबई : तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यावरुन मनसे नेते अमेय खोपकर आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आपापसात भिडले असल्याचे दिसत आहे. अमोल मिटकरी यांनी शिवजयंती ही १९ फेब्रुवारीलाच साजरी झाली पाहिजे अशी भूमिका मांडली होती. यामध्ये व्होट बँकचं राजकारण दिसतंय, असंही ते म्हणाले होते.

यावर अमेय खोपकरांनी “आपण दरवर्षी दिवाळी, गणपती आणि हिंदू धर्माचे सण साजरे करतो ते तारखेनुसार साजरे करत नाही. महाराष्ट्रातील नव्हे, देशातील नव्हे जगातील सर्व लोकांसाठी छत्रपती शिवाजी महारांची जयंती हा एक सण आहे,” असं म्हटलं होतं.

तसेच “तिथीनुसार शिवजयंती साजरी करायला जो आडकाठी आणतो, जो या मुद्द्याचंही किळसवाणं राजकारण करतो अशा राष्ट्रवादीच्या फालतू आमदाराला भर चौकात फटके मारायला पाहिजेत,” असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीट करत अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधला.

त्यांच्या या ट्विटवर अमोल मिटकरी यांनी देखील अप्रत्यक्ष उत्तर दिलं असून “माझ्या सवे लढाया वाघास बोलवा रे कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,” असं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!