🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : जगातील अनेक देशांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु झाली आहे. तसेच भारतातील नागरिकही 5G च्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळेच भारतात देखील लवकरच 5G नेटवर्क उपलब्ध होणार आहे. मात्र 5G नेटवर्कच्या वापरासंदर्भात अनेकांना विविध प्रश्न पडलेले आहेत. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
5G सेवेच्या वापरासाठी 5G स्मार्टफोन घ्यावा लागेल का?
5G नेटवर्कचे वापरकर्ते (यूजर) होण्यासाठी तुम्हाला 5G स्मार्टफोन खरेदी करावा लागणार आहे. जर तुम्ही 4G स्मार्टफोनमध्ये 5G सिमकार्ड वापरले, तरी देखील त्यात केवळ 4G, 3G आणि 2G नेटवर्कच उपलब्ध होईल. 5G नेटवर्क उपलब्ध होणार नाही. 5G नेटवर्कचा वापर करण्यासाठी फोनमध्ये नवीन रेडिओ (NR) तंत्रज्ञान वापरले जाते, जे 4G स्मार्टफोनमध्ये वापरल्या जाणाऱ्या LTE तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असते. तसेच 5G मोबाईल फोनमध्ये 5G सोबत 4G, 3G आणि 2G नेटवर्कचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला 5G सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.
नवीन 5G स्मार्टफोन घ्यावे लागेल का?
5G नेटवर्कचा वापर करण्यासाठी नवीन सिमकार्ड घेण्याची आवश्यकता नाही. 5G स्मार्टफोनमध्ये 4G सिमकार्डद्वारे 5G नेटवर्क ऍक्सेस करता येईल. मात्र तरी देखील नवीन 5G सिमकार्डमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने लेटेस्ट तंत्रज्ञान उपलब्ध असेल. त्यामुळे शक्य असल्यास नवीन 5G सिमकार्ड घ्यावे.
5G नेटवर्क कधी सुरु होणार?
भारतात 5G स्पेक्ट्रम लिलाव प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे पुढील 2 ते 3 महिन्यात 5G नेटवर्क लॉन्च होण्याची शक्यता आहे. तसेच रिलायन्स जिओकडून देशातील 13 शहरांमध्ये 5G नेटवर्क सर्वप्रथम उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
