🕒 1 min read
नवी दिल्ली: आज (११ जुलै) सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी नवीन संसदेच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. मात्र यावरूनच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी संताप व्यक्त करत पंतप्रधान मोदींनी घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.
This morning, I had the honour of unveiling the National Emblem cast on the roof of the new Parliament. pic.twitter.com/T49dOLRRg1
— Narendra Modi (@narendramodi) July 11, 2022
“संविधानाने संसद, सरकार आणि न्यायपालिकेचे अधिकार वेगळे केले आहेत. सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीवर राष्ट्रीय चिन्हाचे अनावरण केले नसावे. लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे प्रतिनिधित्व करतात जे सरकारच्या अधीन नसतात. मोदी यांनी सर्व घटनात्मक नियमांचे उल्लंघन केले आहे.”, असे ट्वीट असदुद्दीन ओवैसी यांनी केले आहे.
Constitution separates powers of parliament, govt & judiciary. As head of govt, @PMOIndia shouldn’t have unveiled the national emblem atop new parliament building. Speaker of Lok Sabha represents LS which isn’t subordinate to govt. @PMOIndia has violated all constitutional norms pic.twitter.com/kiuZ9IXyiv
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) July 11, 2022
दरम्यान संसदेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झली असून आज मोदींच्या हस्ते संसदेच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. यावेळी संसदेच्या निर्मितीत सहभागी असलेल्या श्रमजीवींशी मोदींनी संवाद झाला. त्यांच्या प्रयत्नांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांनी आमच्या देशासाठी दिलेले योगदान सदैव लक्षात ठेवू. असे मोदींनी यावेळी म्हटले.
महत्वाच्या बातम्या:
- Sharad Pawar : “सुसंस्कृत आणि सुबुद्ध समाज घडवण्यात…”, औरंगाबादेत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
- SL vs AUS : चाललंय काय? कसोटी सामन्यादरम्यान लंकेचा अजून एक खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह!
- Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटातील “त्या” आमदारांना दिलासा – ॲड. राजसाहेब पाटील
- Rohit Pawar | “सत्तेसाठी केला जाणारा घोडेबाजार बघता…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
- Jayant Patil : येत्या निवडणुकीत NCP कडून २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे असणार- जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
