🕒 1 min read
औरंगाबाद: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (११ जुलै) औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी काही जुन्या आठवणीना उजाळा दिला. ४० वर्षांपूर्वी १९८३ साली एक किलोमीटर पायी येत या वाचनालयाचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली होती. आज ४० वर्षांनी वाचनालयाचा विस्तार वाढलेला बघून आनंद वाटला. असे उद्गार शरद पवारांनी (Sharad Pawar ) यावेळी काढले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले कि, “श्री. काशिनाथ जाधव यांनी मेहनतीने रुजवलेले हे रोपटे बहरलेले बघताना आनंद वाटला. ११० पुस्तकांपासून सुरू झालेला प्रवास चाळीस वर्षांनंतर ३२ हजार पुस्तकांवर येऊन पोहोचलाय. त्या जोडीला अभ्यासिकाही उभारण्यात आली आहे, ही चांगली गोष्ट आहे. सुसंस्कृत आणि सुबुद्ध समाज घडवण्यात वाचन संस्कृती आणि ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सांगताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेब या दोन थोर नेत्यांची आठवण येते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेब हे १४ हजार ग्रंथसंपदा ठेवून गेले होते.”
सुसंस्कृत आणि सुबुद्ध समाज घडवण्यात वाचन संस्कृती आणि ग्रंथ महत्त्वाची भूमिका बजावतात. हे सांगताना मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेब या दोन थोर नेत्यांची आठवण येते. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री चव्हाण साहेब हे १४ हजार ग्रंथसंपदा ठेवून गेले होते. pic.twitter.com/xZh45mfGwe
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 11, 2022
आज या ग्रंथसंपदेचे रूपांतर ग्रंथालयात झाले आहे. त्यांचे ग्रंथावर प्रचंड प्रेम होते. नव्या पिढ्या पुस्तक वाचून घडतात. या ग्रंथालयाद्वारे हे काम ४० वर्षांपासून होत आहे. या कार्यक्रमात ‘पाचोळा’कार ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण मराठी साहित्यात बोराडे यांचे स्थान महत्त्वाचे आहे. मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील ते एक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- SL vs AUS : चाललंय काय? कसोटी सामन्यादरम्यान लंकेचा अजून एक खेळाडू आढळला कोरोना पॉझिटिव्ह!
- Supreme Court | सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटातील “त्या” आमदारांना दिलासा – ॲड. राजसाहेब पाटील
- Rohit Pawar | “सत्तेसाठी केला जाणारा घोडेबाजार बघता…” ; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर रोहित पवारांची प्रतिक्रिया!
- Jayant Patil : येत्या निवडणुकीत NCP कडून २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे असणार- जयंत पाटील
- Arvind Sawant: “संपर्कात असलेल्या १४ खासदारांची नावे द्या”; अरविंद सावंतांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
