🕒 1 min read
मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात निलेश राणे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘मुख्यमंत्र्यांनी ३०० आमदारांना मुंबईत घर देण्याचा निर्णय घेतला. मुळात मुंबईला आल्यावर बहुतेक आमदार संध्याकाळी काय करतात हा तपास अगोदर मुख्यमंत्र्यांनी करायला हवा होता. अधिवेशनाच्या काळात आमदार कुठे असतात काय करतात हे जर लोकांना कळलं तर त्यांचा राजकारणावर उरलासुरला विश्वास उठेल’, असे राणे म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी काही दिवस पूर्वी मांडला होता. मला या गोष्टीचे समाधान आहे कि देशाचा आर्थिक भार सोसणाऱ्या मुंबई रूप पुढे कसं असणार आहे, ते ठरवण्याच्या दृष्टीने कष्टकऱ्यांना आणि झोपडपट्टीवासियांना हक्काची घरे मिळावीत म्हणून ज्या योजना आणल्या आहेत त्यासाठी मी मंत्र्यांचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो’, असेही मुख्यमंत्री ठाकरे यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- “भाजपने विवेक अग्नीहोत्रींना चित्रपट ‘youtube’ वर अपलोड करण्यास सांगावे”, केजरीवालांचा सल्ला
- “ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता…”, भातखळकरांचा हल्लाबोल
- “परमबीर सिंह यांच्या CBI चौकशीमुळे बरेच उंदीर…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- “पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या चरणी आसरा घ्यावा लागत असेल तर…”, द कश्मीर फाईल्सवरून केजरीवालांची टीका
- IPL 2022 : “पिवळ्या जर्सीमध्ये…”, धोनीनं कॅप्टनशिप सोडल्यानंतर विराट झाला भावूक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
