मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयने (Supreme Court) महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका दिला असून परमबीर सिंहांच्या सर्व प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘राज्यातल्या मविआ सरकारवर चहूबाजूंनी संकंट येत आहेत. ED आणि अन्य केंद्रीय यंत्रणांवर प्रश्न उपस्थित करून काही साध्य झालं नाही. आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या मागणीनुसार त्यांच्यावरील खटल्यांचा तपास CBI ने करावा असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय. किती ही नाचक्की.’
पुढे ते म्हणाले की, ‘कोर्टात जाऊन थपडा खायच्या, नाचक्की करून घ्यायची ही ठाकरे सरकारची आता सवयच झालेली आहे. सत्तेसाठी केलेल्या तडजोडींचं फळ आता शिवसेनेला भोगावं लागणार आहे. अर्थात, परमबीर सिंह यांच्या CBI चौकशीमुळे जहाज बुडण्याच्या भीतीनं बरेच उंदीर सैरावैरा धावू लागले, तरी आश्चर्य वाटायला नको.’
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
- “कुठल्याही विभागाला दुर्लक्षित ठेवण्याची माझी भूमिका नाही”- अजित पवार
- वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार – निलेश लंके
- “… तर आम्ही ही कमी पडणार नाही”- ओमराजे निंबाळकर
- आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा


