मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत बोलत असतांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. यावेळी मुंबई महापालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षांकडे सुरुवातीला १३० कोटींची संपत्ती सापडली. आता ती ३०० कोटीपर्यंत गेली आहे. कोरोनाने लोक मरत होते. परंतु यांनी २४ महिन्यात ३८ संपत्ती खरेदी केल्या, असे फडणवीस म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी नवे दाऊद कनेक्शन उघड केले. दरम्यान, या मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारचे वस्त्रहरण केले. कोविड काळातील लूट चव्हाट्यावर आणताना नवे दाऊद कनेक्शन उघड केले. ठाकरे सरकारची चिंधीगिरी आता ढळढळीतपणे लोकांसमोर आली आहे.’
दरम्यान, मुंबई पोलीस दलातील इसाक बागवान हे अधिकारी असून त्यांच्या बंधूंनी एक तक्रार केली आहे. ज्यामध्ये बारामती ते मुंबईपर्यंतच्या संपत्तीची यादी आहे. ती संपत्ती नोकरीत असताना त्यांनी फरीद मोहम्मद अली याच्या नावाने खरेदी केली. तसेच तो दाऊदच्या संपर्कात होता, असेही फडणवीसांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
- आवडता नेता कोण विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या; “घर की मुर्गी…”
- “परमबीर सिंह यांच्या CBI चौकशीमुळे बरेच उंदीर…”; चंद्रकांत पाटलांचा टोला
- “पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या चरणी आसरा घ्यावा लागत असेल तर…”, द कश्मीर फाईल्सवरून केजरीवालांची टीका
- IPL 2022 : “पिवळ्या जर्सीमध्ये…”, धोनीनं कॅप्टनशिप सोडल्यानंतर विराट झाला भावूक!


