🕒 1 min read
नवी दिल्ली: द काश्मीर फाईल्स चित्रपट संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे. मात्र या चित्रपटावरून राजकीय वर्तुळातही अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा चित्रपट बघितला असून त्याचे कौतुकही केले आहे. विरोधी पक्षाकडून भाजप या चित्रपटाचे प्रमोशन करत असल्याचे म्हटले जात आहे. आता यावरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.
“8 वर्षे केंद्र सरकार चालवल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या चरणी आसरा घ्यावा लागत असेल तर त्याचा अर्थ पंतप्रधानांनी 8 वर्षात एकही काम केले नाही”, अशी टीका अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. संपूर्ण भाजप देशभरात एका चित्रपटाचे पोस्टर लावत आहे.असे चित्रपटाचे पोस्टर लावण्यासाठी तुम्ही राजकारणात आले होते का? तुमच्या मुलांना काय उत्तर द्याल घरी जाऊन? असा सवालही केजरीवाल यांनी केला आहे.
दरम्यान द काश्मीर फाईल्स हा खूप चांगला चित्रपट आहे. तुम्ही सर्वांनी तो पाहावा. असे चित्रपट आणखी बनवले गेले पाहिजेत. अशा चित्रपटांच्या माध्यमातून लोकांना सत्य कळतं आणि भूतकाळात घडलेल्या घटनांना कोण जबाबदार होते हेदेखील समजते.अशी प्रतिक्रिया नरेंद्र मोदी यांनी दिली होती.
महत्वाच्या बातम्या:
आवडता नेता कोण विचारताच अमृता फडणवीस म्हणाल्या; “घर की मुर्गी…”
केंद्राने हटवलेले निर्बंध हे दुसरे स्वातंत्र्यच आहे- संजय राऊत
आमदारांना 300 घरं देणार, मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा
“… तर आम्ही ही कमी पडणार नाही”- ओमराजे निंबाळकर
वनविभागातर्फे सुरू असलेल्या गॅबियन बंधाऱ्याच्या कामांमध्ये भ्रष्टाचार – निलेश लंके
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
