टीम महाराष्ट्र देशा : भाजप पक्षाने गेल्या काही महिन्यांमध्ये तीन ज्येष्ठ नेते गमावले आहेत. त्यामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि माजी बाबुलाल गौर या नेत्यांचे असे अचानक जाणे हे भाजपसाठी अनपेक्षित होते. यावर भाजप खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी अजब दावा केला आहे. विरोधकांच्या वाईट शक्तीच्या प्रयोगामुळेचं भाजपचे तीन ज्येष्ठ नेते दगावले असल्याचा आरोप साध्वी यांनी केला आहे. साध्वींच्या या बेलगाम वक्तव्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मुलन संस्थेने (अनिस) देखील प्रतिक्रिया दिली आहे.
‘घटनेने देशातील सामान्य नागरिकाला विज्ञानवादी दृष्टीकोन बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तर लोकप्रतिनिधींना देखील पद ग्रहण करताना घटनेची शपथ दिली जाते. त्यामुळे अशी वक्तव्य करून साध्वी सारखे लोकप्रतिनिधी घटनेची पायमल्ली करत आहेत. समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवणे ही विकृती आहे. अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये चुकीचा संदेश दिला जातो. त्यामुळे साध्वी सारख्यांना इतिहास आणि विज्ञान पुन्हा शिकण्याची गरज आहे. तर साध्वींच्या वक्तव्यावरून कॉंग्रेसने गुन्हा दाखला करावा,’ अशी प्रतिक्रिया अनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी दिली आहे.
दरम्यान विरोधकांच्या वाईट शक्तीच्या प्रयोगामुळेचं भाजपचे तीन ज्येष्ठ नेते दगावले असल्याचा आरोप भाजप भोपाळच्या खा. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला होता. या वाईट शक्तीच्या प्रयोगाबाबत मला एका महाराजांनी सांगितल होत असं देखील म्हणाल्या आहेत. माजी अर्थमंत्री अरुण जेटली आणि एमपीचे माजी मुख्यमंत्री बाबूलाल गौर यांच्या शोकसभेत साध्वी प्रज्ञासिंह यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत.
- ‘स्वराज आणि जेटली तर गेले आता पुढचा नंबर मोदींचा’
- ‘आमदार असो किंवा नसो तरीही राज ठाकरे हे खणखणीत नाणं’
- सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री
- भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

