टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत. तसेच एकमेकांवर टीका टिप्पणी करताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलेच शाब्दिक युद्ध सुरु झालेले पाहायला मिळत आहे. बीड येथील पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांच्या संवाद दौऱ्यावर टीका केली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांनी सत्ता असताना जनतेशी संवाद साधला असता, तर ही वेळ आली नसती, असा टोला सुळे यांच्या संवाद दौऱ्याला लगावला आहे.
तसेच पुढे बोलताना विरोधी पक्षांच्या यात्रांना फारशी गर्दी जमत नाही, त्यामुळे त्यांना मंगल कार्यालयात सभा घ्याव्या लागत आहेत. सत्ता होती तेव्हा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया ताई स्वतःशी संवाद करायच्या, त्यावेळीच जनतेशी संवाद केला असता तर ही वेळ आली नसती असं विधान केले. तसेच ज्यांनी लोकसभेत भाजपला विरोध केला, त्यांना बीडच्या जनतेने जागा दाखवली. पुढच्या टप्प्यात काँग्रेसचे काही आमदार आमच्या यात्रेचं स्वागत करणार आहेत. ते स्वागत आम्ही स्वीकारणार आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी पक्षांतर केलेल्या नेत्यांना स्वच्छ करण्यासाठी सरकार कोणती वाशिंग पावडर वापरत आहे असा प्रश्न विचारला होता. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे विकासाचं डॅशिंग रसायन आहे असं उत्तर दिले होते.
भाजपच्या महाजनादेश यात्रेला जनतेची प्रचंड भीती- धनंजय मुंडे
भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर सुप्रिया सुळेंचे सूचक विधान, म्हणाल्या…
- दिपाली सय्यद यांनी पुण्यातून विधानसभा लढवण्याची व्यक्त केली इच्छा
- भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा मृत्यू विरोधकांच्या मारक शक्तीमुळेचं झाला, साध्वी पुन्हा बरळली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

