Share

कोकणात राष्ट्रवादीला खिंडार, ‘या’ नेत्याचा शिवसेना प्रवेश झाला निश्चित

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी कॉंग्रेसला चिपळूणमध्ये धक्का बसणार आहे. कारण माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आल्याची जाधव यांनी कबुली दिली होती. कुटुंब आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार असल्याची माहिती जाधव यांनी दिली होती. आज जाधव यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र पक्षांतरावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदार संघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत आपण दोन दिवसात पक्षांतर करत असल्याची त्यांनी जाहीर घोषणा केली. मात्र आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्यामुळे जाधव यांचा सेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. मात्र भास्कर जाधव यांच्या पक्षांतराने अनेक कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर जाधव म्हणाले की, येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाहीत त्यांच्याबद्दल नाराजी नसेल.

दरम्यान, भास्कर जाधव यांनी शिवसेनेत घरवापसी करण्याचा निर्णय घेतल्यास राष्ट्रवादीला कोकणात मोठा धक्का बसणार आहे. कारण भास्कर जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते तसेच त्यांनी आघाडी सरकारच्या काळात अनेक महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. त्यामुळे आधीच संकटात असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा अजून एक धक्का आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!