Share

Ashadhi Ekadashi 2022 : मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेला ‘नवले’ दाम्पत्याला मिळाला ‘मानाचा वारकरी’ सन्मान

Published On: 

पंढरपूर: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य  वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली. मुख्यमंत्र्यांसोबत यंदा शेतकरी मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (Nawale farmer couple) यांना महापुजेचा मान मिळाला. गेल्या २० वर्षांपासून ते वारी करत आहे.

५२ वर्षीय शेतकरी मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले (४७) हे दाम्पत्य बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील रूई येथील रहिवासी असून १९८७ पासून हे दाम्पत्य न चुकता वारी करत आहेत. त्यांना यंदाचा ‘मानाचा वारकरी’ सन्मान प्राप्त झाला.

दरम्यान मानाच्या वारकऱ्यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून कडून वर्षभरासाठी देण्यात येणाऱ्या मोफत एसटी पासचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री व मान्यवरांच्या हस्ते ‘रिंगण’ या वारी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!