🕒 1 min read
पंढरपूर: अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
दरम्यान यंदाचा महापुजेसाठी मुख्यमंत्र्यांसोबत शेतकरी मान मुरली नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई नवले यांना मिळाला. गेल्या २० वर्षांपासून ते वारी करत असून यंदा त्यांना हा मान मिळाला. महापूजेसाठी मुख्यमंत्री शनिवारी रात्री उशिरा पंढरपूर येथे दाखल झाले होते. त्यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित केलेल्या ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली.
आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा. pic.twitter.com/0E0R0geU9k
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 10, 2022
महापुजेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?
माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा असून आज मी १२ कोटी जनतेच्या वतीने विठ्ठलाची पूजा केली. शेतकरी, कष्टकरी, कामगार अशा सर्व घटकांना सुख समृध्दी लाभू दे, असे साकडे विठूरायाला मी घातले आहेत. यावेळी पावसाळ्यात निवडणुका घेणं योग्य आणि सोयीचे होणार नाही. तसेच राज्यातील ओबीसी समाजाला न्याय मिळेलच. आपल्या देशात लोकशाहीत बहुमताला महत्व आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टवर माझा पूर्ण विश्वास आहे. यानंतर लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- CM Eknath Shinde : कोणताही जल्लोष साजरा करू नका, अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातल्या दोघांचा मृत्यू झाला आहे – एकनाथ शिंदे
- Abdul Sattar : “राऊतांनी आईची शपथ…” ; बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याच्या आरोपावर अब्दुल सत्तार संतापले
- IND vs ENG : भारताची मालिकेत विजयी आघाडी, ४९ धावांनी जिंकला दुसरा सामना
- IND vs ENG : विराट पुन्हा एकदा फ्लॉप, भारताचं इंग्लंडसमोर १७१ धावांचे लक्ष
- Santosh Bangar : उध्दव ठाकरेंसाठी रडणारे आमदार संतोष बांगर शिंदे गटात का गेले? बांगर म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
