मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या छोट्या पडद्यावरील मालिकेने काही महिन्यापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते. या मालिकेचा चाहतावर्ग देखील खूप मोठा होता. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेत धनश्रीने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्रीने कोल्हापूरकरांसाठी एक खास पोस्ट केली आहे. सध्या या पोस्टच्या चांगल्याच चर्चा रंगत आहेत.
धनश्रीने ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील काही कलाकारांणसोबत मज्जा-मस्ती करतानाचे काही फोटो इंस्टाग्राम वरून शेअर केले आहेत. आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, “या होत्या माझ्या कोल्हापुर च्या काही आठवणी… कोल्हापूर या शहराने आजपर्यंत इतकं प्रेम दिलय , ईथल्या माणसांनी इतकं प्रेम दिलं आहे.. इथे आलं की घरी आल्या सारखच वाटतं…असच प्रेम राहु दे .. इथुन पुढे सुद्धा तुमच्या प्रेमाची अशिच गरज आहे..”
https://www.instagram.com/p/Cfq-2TVt0jB/
धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी ती नेहमी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या तिची इंस्टाग्राम पोस्ट खूप व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


