🕒 1 min read
पंढरपूर: अनेक राजकीय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. यंदाचा महापूजेचा मान कुणाला मिळणार, यावर अनेक चर्चा रंगत होत्या. अखेर तो मान नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच प्राप्त झाला. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रथेप्रमाणे आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा पार पडली. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची ही पहिलीच महापूजा होती. असंख्य वारकऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी पत्नी लता यांच्यासह विठुरायाची महापूजा केली.
महापुजेनंतर एकनाथ शिंदे यांनी सांगितले कि, ते लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेणार आहेत. शिवसेनेशी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना भेटलेले नाहीत. त्यामुळे या भेटीत ते नेमके काय बोलणार आणि काय ठरणार याकडे सर्वांचे लक्ष असेल. शिवसेनेने शिंदे गटाला गद्दार म्हणून हिणवले आहे तर काल (९ जुलै) दिल्ली येथील पत्रकार परिषदेत शिंदे यांनी या उठावाला गद्दारी नव्हे तर अन्यायाविरोधातील लढा म्हटले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबतची भेट नक्कीच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.
महापुजेनंतर काय म्हणाले मुख्यमंत्री?
- CM Eknath Shinde : आषाढी एकादशीनिमित्त नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पंढरपुरात महापूजा
- CM Eknath Shinde : कोणताही जल्लोष साजरा करू नका, अमरनाथ यात्रेला गेलेल्या पुण्यातल्या दोघांचा मृत्यू झाला आहे – एकनाथ शिंदे
- Abdul Sattar : “राऊतांनी आईची शपथ…” ; बंडखोर आमदारांनी ५० कोटी घेतल्याच्या आरोपावर अब्दुल सत्तार संतापले
- IND vs ENG : भारताची मालिकेत विजयी आघाडी, ४९ धावांनी जिंकला दुसरा सामना
- IND vs ENG : विराट पुन्हा एकदा फ्लॉप, भारताचं इंग्लंडसमोर १७१ धावांचे लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
