गडचिरोली : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमिवर दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोलीकडून सुधारीत आदेश निर्गमित करण्यात आले होते. तथापि संदर्भ क्र.04 मधील सुधारीत मार्गदर्शक सूचनेनसुार परिच्छेद क्र.6 व 14 अन्वये पुढील बाबीमध्ये सुधारणा करण्यात येत आहेत.
1) वन विभाग ज्यामध्ये वनीकरण व इतर संबंधित उपक्रम, रेशीम शेतीसह
2) व्यावसायीक तसेच खाजगी आस्थापना यामध्ये इलेक्ट्रीक पंखे व कुलर विक्री व दुरुस्ती दुकाने सकाळी 7.00 ते दुपारी 1.00 पर्यंत चालु राहतील.
या व्यतिरिक्त उर्वरीत आदेशातील नमूद केलेले सर्व निर्देश कायम राहतील असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण दीपक सिंगला यांनी कळविले आहे.


