मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरले आहे. नवाब मलिकांनी सकाळी ट्विट करत फडणवीसांवर गंभीर आरोप केला आहे.
गेली 7 वर्ष या देशात केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग होत राहिला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा पराभव निश्चित झाल्यानंतर सपाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला लागली आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजी गेल्या 7 वर्षांपासून तपास यंत्रणांचा वापर करत होते. निवडणुकांच्या आधी पवार साहेबांना नोटीस काढण्यासाठी त्यांनी कटकारस्थान केले होते. आता आम्ही त्यांना उघडे करत असताना माझ्याविरोधात कारवाई झाली पाहिजे, या पद्धतीने ते पाठपुरावा करत आहेत, असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
Ex- Maha CM is showing lot of interest in directing central agencies to take action against me. I suggest he gets himself appointed as OSD which he has plenty of experience of appointing as CM…and Kirit Somaiyya as Spokeperson .#politicalvendetta#misuseofpower
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) December 20, 2021
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. आणि किरीट सोमय्यांना या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी ट्वीटमधून देवेंद्र फडणवीसांना लगावला होता.
दरम्यान, राजकीय द्वेष ठेवून लोकांवर कारवाई केली जात आहे हे आता उघड होतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही मागून करू नका, जबाबदारी स्वीकारा आणि कारवाई करा. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही थांबणार नाहीत, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- हेमा मालिनीच्या गालांची तुलना रस्त्याशी करणाऱ्या गुलाबरावांनी अखेर मागितली माफी
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हेमा मालिनीची प्रतिक्रिया
- आमदार, मंत्री झाला तरीही पालिकेत जीव कसा घुटमळतोय; शेलार किशोरी पेडणेकरांच्या निशाण्यावर
- जिथे संकट तिथे फक्त ‘शिवसेना’च; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे प्रतिपादन..!
- “निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

