🕒 1 min read
मुंबई : माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केले होते. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता.
भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सर्व स्तरातून टीकेची झोड उठल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी माफीही मागितली आहे. गुलाबराव पाटील यांच्या या विधानाचे राज्यात पडसाद उमटले होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यापासून ते भाजप नेत्या चित्रा वाघ या सर्वांनी गुलाबरावांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे.
गुलाबराव पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही पाटील यांना वक्तव्य मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते. त्यानंतर पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे.
सामान्य लोकांनी बोलणे वेगळे, पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असे वक्तव्य करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असे वक्तव्य केलं जाऊ नये, असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, एकीकडे टीकेची झोड उठत असताना दुसरीकडे शिवसेनेचे खासदा संजय राऊत आणि प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याप्रकरणी त्यांची पाठराखण केल्याचेही पाहायला मिळाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावर हेमा मालिनीची प्रतिक्रिया
- आमदार, मंत्री झाला तरीही पालिकेत जीव कसा घुटमळतोय; शेलार किशोरी पेडणेकरांच्या निशाण्यावर
- जिथे संकट तिथे फक्त ‘शिवसेना’च; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे प्रतिपादन..!
- “निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”
- “दारुवरचा कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारला पैशांची गरज आहे”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
