🕒 1 min read
लातूर : जिथे संकट तिथे सर्वप्रथम शिवसेना, हा इतिहास आहे. त्यामुळे ऊन असो वारा असो पावसात मदत असो अथवा महामारी अशा कित्येक संकटांना शिवसैनिक तोंड देतात. त्यामुळे गावागावात शहरात शिवसेनेच्या शाखा या सर्वसामान्यांचे हक्काचे आशास्थान बनल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची संघटनात्मक रचनेचा सर्वत्र गौरव होत असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी लातूर येथे केला. लातूर येथे मित्रनगर व प्रभाग ९ खोरी गल्ली येथे शिवसेना शाखांच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलतांना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Udhav Thackrey) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार अतिशय चांगले काम करत आहे. याचा प्रत्यय आंतरराष्ट्रीय माध्यम व न्यायालयाने केलेल्या कौतुकातून समोर आला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विकासाचा वेग दुपटीने करण्यासाठी आशीर्वाद असू द्या. तसेच नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांने विजयी करा. असे आवाहन ते सर्व मतदारांना करतांना दिसून येत आहे. मराठवाडा संपर्क नेते तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे लातूर-बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.
आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक व संघटनात्मक बांधणीविषयी यावेळी चर्चा सुरू आहेत. यावेळी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मराठवाडा दौऱ्यात अनेक पक्षातील कार्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले. मराठवाड्यात शिवसेनेला अतिशय चांगले वातावरण असून आगामी काळात पक्षाला मतदानातुन जनता नक्कीच आशीर्वाद देईल, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा महानगर संघटक योगेशआप्पा स्वामी, यांनी जाहीर नागरी सत्कार केला. यावेळी जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, शिवाजी माने, नामदेव चाळक, पप्पू कुलकर्णी, सुनीता चाळक, तालुकाप्रमुख ऍड. प्रवीण मगर आदींसह आजी माजी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थिती होती.
महत्त्वाच्या बातम्या
- पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने निवडला वर्षातील सर्वोत्कृष्ट T20 संघ; कोहली-रोहितला दिला डच्चू
- ”इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”
- ‘त्या’ पार्टीत कोण मंत्री होते हे जाहीर करा, अन्यथा…; पेडणेकरांचं शेलारांना आव्हान
- Pro Kabaddi : विकास कंडोला करणार हरियाणाचे नेतृत्व
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
