मुंबई : माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील () यांनी केले होते. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. गुलाबराव पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी देखील केली जात होती. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.
मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित ते बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. पण मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले असतील. काही वर्षांपूर्वी लालू प्रसाद यादव यांनी देखील असेच वक्तव्य केले होते. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली असल्याचे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
कोणत्याही महिलांबाबत अशा प्रकारची कमेंट करणे योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणे वेगळे, पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असे वक्तव्य करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असे वक्तव्य केलं जाऊ नये, असे हेमा मालिनी म्हणाल्या आहेत.
दरम्यान, सर्व स्तरातून टीकेची झोड उठत असताना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी गुलाबराव पाटलांची पाठराखण केली आहे. हे प्रकरण आखणी चिघळण्यापूर्वीच गुलाबराव पाटील यांनी माफीही मागितली आहे.
महत्वाच्या बातम्या
- आमदार, मंत्री झाला तरीही पालिकेत जीव कसा घुटमळतोय; शेलार किशोरी पेडणेकरांच्या निशाण्यावर
- जिथे संकट तिथे फक्त ‘शिवसेना’च; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे प्रतिपादन..!
- “निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”
- “दारुवरचा कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारला पैशांची गरज आहे”
- “इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
