Share

आमदार, मंत्री झाला तरीही पालिकेत जीव कसा घुटमळतोय; शेलार किशोरी पेडणेकरांच्या निशाण्यावर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : काही दिवसांपूर्वी आरोप भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेत मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे गंभीर आरोप केले. त्यानंतर शिवसेनेकडून त्यांच्या आरोपांना उत्तरही देण्यात आले. मात्र आशिष शेलारांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मुंबई महापालिकेला टीकेचे लक्ष्य केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेत्री अमृता अरोरा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे करण जोहरने आयोजित केलेली पार्टी चांगलीच चर्चेत आली आहे. या पार्टीला राज्य मंत्री मंडळातील मंत्री उपस्थित होते. आशिष शेलारांच्या या टीकेला मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar ) यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांना लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक कोरोना असल्याने महाराष्ट्रालाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते वेगळेच वागत असतात असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

खोटे आरोप करू नका, त्या पार्टीत जे मंत्री सहभागी झाले होते. ते सिद्ध करा नाहीतर जनतेची माफी मागा, असे आव्हान किशोरी पेडणेकर यांनी शेलार केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!