🕒 1 min read
सांगली : सध्या राज्यात अनेक नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे आहेत. सत्ताधारी विरोधकांमध्ये टीका-टिपण्णी, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.
या निवडणुकीमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील (R.R. Patil)यांचे चिरंजीव रोहित पाटील (Rohit R.R. Patil) देखील आघाडीवर आहेत. या निवडणुकीचा निकाल 19 तारखेला स्पष्ट होणार आहे.
‘निवडणुकीच्या निकालावेळी तुम्हाला माझ्या बापाची आठवण तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही’, असे म्हणत कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान रोहित पाटील यांनी सर्व विरोधकांना खुलं आव्हान दिलं आहे.
आजच्या नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा सांगता सभेमध्ये मनोगत व्यक्त केले. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवत असून केलेलं काम लोकांसमोर ठेवलं आणि पुढे काय करणार आहोत हे देखील सांगितले. मला विश्वास आहे ह्या भागातील सुज्ञ जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ देऊन विजयी करेल. pic.twitter.com/taOlsIgSaA
— Rohit R.R. Patil (@rohitrrpatilncp) December 19, 2021
आता ज्यांच्या हाती 15 वर्षे सत्ता होती, नगरपंचायत होती, आज तेच लोक आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहे. मी कवठेमहांकाळचा परिसर संपूर्ण पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे, असेही रोहित पाटील म्हणाले आहेत.
विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जे लोक मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास केली आणि कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं, असे खुलं आव्हान देखील रोहित पाटील यांनी विरोधकांना केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- “दारुवरचा कर कमी करणाऱ्या ठाकरे सरकारला पैशांची गरज आहे”
- “इथे प्यायला पाणी नाही अन् राज्य सरकारने दारु स्वस्त केली, आता लोकांनी दारु प्यायची का?”
- ‘त्या’ पार्टीत कोण मंत्री होते हे जाहीर करा, अन्यथा…; पेडणेकरांचं शेलारांना आव्हान
- सहकार क्षेत्र खाजगी लोकांच्या घशात घालण्याचे षडयंत्र चाललेले आहे-देवेंद्र फडणवीस
- “पुरात वाहून आलेल्या पुण्याच्या स्वयंघोषित दादांना आपल्या मतदारसंघातही…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
