Share

“गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणतात वर्ल्डकप जिंकू”

Published On: 

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणुकीत भाजप (BJP)ने आपला झेंडा फडकवला आहे. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या या विजयानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. त्यावेळी बोलताना महाविकास आघाडीवर मुख्यत: शिवसेनेवर सडकून टीका केली. भाजपच्या या विजयाबद्दल आणि नारायण राणे यांनी केलेल्या टीकेबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नारायण राणेंना चांगलंच सुनावले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुका जिंकलेल्या नाहीत. जिल्हा बँक निवडणुकीत 25 मतदार, 50 मतदार त्यांचे अपहरण करणे, त्यांना पैसे देणे, एखादी बँक जिंकल्यावर संपूर्ण राज्य जिंकण्याचे आवाहन करत आहेत. हे म्हणजे असं झालं की, गल्लीत क्रिकेट जिंकणारे म्हणत आहेत की आम्ही वर्ल्डकप जिंकू, असं म्हणत नवाब मलिक यांनी राणे कुटुंबाने केलेल्या गाजावाजावरुन डिवचलं आहे.

विरोधकांनी केलेल्या आरपोंना तेवढ्याच क्षमतेने तोंड देणारे यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली असून नव्या वर्षात अनेक घोटाळे समोर आणणार आहे, असा इशाराही यावेळी नवाब मलिकांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!