Share

‘या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या उमेदीने जगण्याचा संकल्प करूया’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दोन वर्षांपासून कोरोनामुळे (Corona) जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले काही महिने कोरोनाला ब्रेक लागला होता. परिस्थिती पूर्वपदावर येत होती. परंतु आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमायक्रॉन’ (Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे २०२२ वर्षाची सुरुवातही ओमायक्रॉन व्हेरियंटच्या वाढत्या धोक्यासह झाली आहे. असे असले तरीही जगभरात २०२२ चे स्वागत जल्लोषात आणि नवीन आशेने केले असून देशभरात फटाक्यांची आतषबाजी आणि गजरात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil) यांनी ट्विटच्या माध्यमातून सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले आहेत की,’सर्व नागरिकांना २०२२ या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! २०२१ हे वर्ष आपल्या सर्वांसाठी विविध आव्हानांचे गेले. या सरत्या वर्षातील नकारात्मकता मागे सारून भविष्यकाळात नव्या जोमाने आणि नव्या उमेदीने जगण्याचा आपण सर्वांनी संकल्प करूया.’

दरम्यान, नववर्षाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी नव्या वर्षाचा पहिला दिवस हा अन्नदात्याला समर्पित केला असून पीएम किसान योजनेचा २,००० रुपयांचा १० वा हप्ता नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!