Share

‘कोरेगाव भीमाचा इतिहास महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. या दिवशी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येते. यंदाही हा दिवस प्रशासनाच्या योग्य त्या खबरदारीसह पार पडणार आहे. तसेच कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी देखील अभिवादन केले आहे.

यासंदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’कोरेगाव भीमा येथे ऐतिहासिक जयस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. ऐतिहासिक लढाईत लढलेल्या व शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमाचा इतिहासही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील वीरांना वंदन करण्यासाठी, जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींनी कोरोना प्रतिबंधक नियम तसंच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावं, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी,’ असे आवाहनही अजित पवार तयांनी केलेआहे.

दरम्यान, कोरेगावची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी, इ.स. १८१८ रोजी इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशव्यांच्या मराठा साम्राज्य यांच्यात झाली होती. यामध्ये ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक असून ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होते. इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे सुमारे ५०० महार जातीचे सैनिक होते, तसेच त्यात काही युरोपियन सैनिकही होते. तर मराठ्यांच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होते. पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांविरूद्ध लढले आणि विजयी झाले. या युद्धात पराभूत होऊन पेशवाई साम्राज्याचा अस्त झाला. तडपश्चात युद्धात प्राणाची आहुती दिलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या  स्तंभावर युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकाची नावे देखील कोरण्यात आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!