Share

“परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहीला नाही ना?”, मुनगंटीवारांचा सवाल

Published On: 

मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब यांनी शपथ पत्रात मोठी भाषणं केली, परबांनी शपथनामा क्रूझ पार्टीत पत्ती मारुन लिहिला नाही ना? मग एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या का पूर्ण करत नाहीत, असा सवाल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अनिल परब यांना केला आहे.

सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, वैष्णव देवीला जे घडलं ते दुर्दैवी, प्रशासनाने सोय करायला हवी होती. केंद्राने एसओपी करणं आवश्यक होतं. संजय राऊत काय बोलतात त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. एसटी कामगारांच्या मागण्या शपथ पत्रात, मोठी भाषणं केली, अनिल परब स्व:ता म्हणाले होते. मात्र कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत. शपथनामा हा क्रुझ पार्टीत पत्ती मारून तर लिहीला नाही? असा सवाल त्यांनी केला. शपथनाम्यात जे लिहिलंय त्यावर तुम्ही कृती करायला पाहिजे, असं सुधीर मुनंगटीवार म्हणाले. भाजपची सत्ता येणार का हा प्रश्न नाही, शुन्यातून सत्तेत पोहोचण्यासाठी काम करणार, असल्याचं सुधीर मुनगंटीवर म्हणाले.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लोक गांज्या मारुन बोलतात, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांच्यावर केली होती. याबाबत मुनगंटीवार यांना प्रश्न विचारला असता, मी गंभीरपणे घेत नाही, डॉक्टरापेक्षा कम्पाऊंडर बरा. असा टोला संजय राऊत यांना लगावला. एसटीच्या कर्मचारी संपाबाबत संमजस्यपणे विचार केला पाहिजे. एसटी कर्मचऱ्यांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही शपथनाम्यात सांगितल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देऊ असे तुम्ही म्हणाले होते. तसेच अजित पवारांवर बोलताना मुनगंटीवार म्हणाले, मला अजित दादांचं कौतुक वाटतं, ते कधीच मास्क काढत नाहीत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!