Share

‘…तर कठोर निर्बंध लागू करणार’, अजित पवारांचा इशारा

Published On: 

पुणे : दरवर्षी १ जानेवारी हा दिवस ‘शौर्य दिवस’ म्हणून साजरा करण्यात येत असून यंदाच्या विजयस्तंभ शौर्य दिनाचे हे २०४ वे वर्ष आहे. या दिवशी आंबेडकरी जनता पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने एकत्र येते. यंदाही हा दिवस प्रशासनाच्या योग्य त्या खबरदारीसह पार पडणार आहे. तसेच कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी अभिवादन केले. तद्पश्चात पवारांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी कोरोनाच्या निर्बंधांसंबंधी बोलत असतांना पवार म्हणाले की,’कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांच्या वाढीच्या प्रमाणाचा अंदाज घेऊन नियम लागू करण्याबाबत विचार केला जाणार आहे.’ तसेच आत्तापर्यंत १० मंत्री आणि २० पेक्षा जास्त आमदार पॉझिटिव्ह आले त्यामुळे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे, असेही पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, पुढे कोरोनामुळे लांडेवाडीतील बैलगाडा शर्यतीला जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थगिती संदर्भात बोलतांना अजित पवार म्हणाले की,’कोरोना परिस्थितीचा विचार करून बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली जावी.’ तसेच कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, असेही पवार यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!