बीड : महाराष्ट्राच्या आगामी विधानपरिषद निवडणुकांसाठी भाजपकडून पाच नावांची घोषणा झाली आहे.
यात विशेष बाब म्हणजे भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांना यावेळेसही डावलण्यात आले आहे. राज्यसभेनंतर सलग आता विधान परिषदेतही त्यांना डावलण्यात आलं आहे. यावर आता राष्ट्रीय अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.