Share

सिद्धांत कपूरला ड्रग्ज प्रकरणी जामीन मंजूर, पण चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावावी लागणार

Published On: 

मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा सिद्धांत कपूर आता वादात सापडला आहे. सिद्धांत कपूर याच्यावर ड्रग्ज सेवन केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. बेंगळूरमध्ये झालेल्या एका रेव्ह पार्टीतुन सिद्धांत कपूरला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सिद्धांत कपूरला जामीन मिळाल्याची माहिती समोर येत आहे. जामीन मिळाले असले तरी पोलिसांनी त्यांना चौकशीला बोलावल्यावर त्यांना तिथे हजर रहावे लागणार आहे. अशी माहिती बंगळूरचे डीसीपी भीमाशंकर यांनी दिली.

याप्रकरणावर आता सिद्धांतच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मी सध्या एकच गोष्ट बोलू शकतो की हे शक्य नाही”. असं एका वृत्तसंस्थेसोबत बोलताना शक्ती कपूर म्हणाले.

जाणून घ्या कोण आहे नेमका सिद्धांत कपूर?

सिद्धांत कपूर हा एक अभिनेता आहे. त्याने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये असिस्टंस डायरेक्टर म्हणून देखील काम केले आहे. सिद्धांत शक्ती कपूर आणि शिवांगी कपूर यांचा मुलगा आहे. २०१३ मध्ये सिद्धांत कपूरने त्याच्या ऍक्टिंग करिअरला सुरवात केली होती. अभिनय क्षेत्रामध्ये येण्याच्या आगोदर सिद्धांताने डीजे म्हणून करिअरची सुरवात केली होती. सिद्धांताने गायन क्षेत्रात देखील कामगिरी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!