Share

Ranji Trophy : मुंबईने उत्तराखंडला ७२५ धावांनी मात देत बनवला ‘हा’ विश्वविक्रम

Published On: 

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२२ च्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईचा सामना उत्तराखंडशी झाला. या सामन्यात मुंबईने ७२५ धावांनी विजय मिळवत नवा विश्वविक्रम केला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याही संघाने इतक्या मोठ्या फरकाने विजय मिळवला नव्हता. पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने चमकदार कामगिरी करत उपांत्य फेरीत जागा निश्चित केली आहे.

मुंबईच्या संघाने विश्वविक्रम करत उपांत्य फेरी गाठली
या सामन्यात मुंबईच्या संघाने उत्तराखंडवर पूर्ण वर्चस्व गाजवले. पहिल्या डावात सुवेद पारकरच्या २५२ धावांच्या म्हणजेच द्विशतक आणि सरफराज खानच्या १५३ धावांच्या जोरावर या संघाने ८ बाद ६४७ धावा केल्या. शम्स मुलानीनेही पहिल्या डावात शानदार योगदान देत ५९ धावा केल्या. दुसरीकडे उत्तराखंडचा संघ पहिल्या डावात ११४ धावांत सर्वबाद झाला. मुंबईकडून पहिल्या डावात शम्स मुलानीने ५ बळी घेतले. अशाप्रकारे मुंबईला पहिल्या डावात ५३३ धावांची आघाडी मिळाली.

यानंतर यशस्वी जैस्वालची १३० धावांची शतकी खेळी, कर्णधार पृथ्वी शॉच्या ७२ धावा आणि आदित्य तरेच्या ५७ धावांच्या जोरावर मुंबईने दुसऱ्या डावात पुन्हा एकदा ३ बाद २६१ धावा केल्या. यानंतर मुंबईला एकूण ७९४ धावांची आघाडी मिळाली आणि उत्तराखंडला विजयासाठी ७९५ धावांचे लक्ष्य मिळाले. यानंतर दुसऱ्या डावात उत्तराखंडचा संघ मुंबईच्या गोलंदाजीसमोर गडगडला आणि संपूर्ण संघ अवघ्या ६९ धावांत आटोपला. अशाप्रकारे सामन्यात मुंबईने ७२५ धावांच्या फरकाने विक्रमी विजय मिळवला.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!