मुंबई : राज्यसभा निवडणुकीत सर्वच पक्ष एक एक आमदार, एक एक मत आपल्याकडे वळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. एकही मत फुटू नये, म्हणून शर्थीचे प्रयत्न करीत असलेल्या महाविकास आघाडीला आता तितकाच जोरदार धक्का बसला आहे. कारण सध्या तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदानाचा अधिकार आता नाकारण्यात आलेला आहे. राज्यसभेसाठी या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार नसल्याचे आता स्पस्ष्ट झाले आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करता यावं यासाठी राष्ट्रवादीने सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सुनावणी झाली होती. कोर्टाने आज त्यावर निर्णय देणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र आता कोर्टाने आता ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीला जोरदार धक्का बसला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येणार नाही. परिणामी त्यांची दोन मते घटणार असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान मुंबई सत्र न्यायालयाने आता परवानगी नाकारल्यानंतर आता राष्ट्रवादीने थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मात्र आता वेळ अत्यंत कमी राहिला असल्याने उच्च न्यायालयात आजच त्यावर सुनावणी होते की उद्या त्यावर सुनावणी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यसभा निवडणुकीला आता अवघा एक दिवस बाकी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढली आहे.
राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. ती २०१७ मध्ये झाली होती. मात्र २७ एप्रिल २०१९ रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
महत्वाच्या बातम्या :


