Share

नयनतारा आणि विग्नेशच्या लग्नाला ‘शाहरुख खान’ची हजेरी; पहा PHOTO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा आज विवाहबंधनात अडकली आहे. दिग्दर्शक विग्नेश शिवनला याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. मागच्या सात वर्षांपासून हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत. या लग्नासाठी अनेक कलाकार उपस्थिती राहणर असल्याची माहिती समोर येत होती. विशेष म्हणजे बॉलीवूडचा किंग अभिनेता शाहरुख खान याने नयनताराच्या लग्नाला हजेरी लावली आहे. शाहरुखने काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत. आता हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.

या लग्नसोहळ्यासाठी अभिनेते रजनीकांत यांनी सुद्धा हजेरी लावली. नयनतारा आणि विग्नेश या दोघांनी ‘जेड बाय मोनिका’ या प्रसिद्ध फॅशन डिजायनरने डिझाईन केलेला पोशाख  घातला आहे. चाहत्यांना यांचा लग्नातील लुक कसा असेल याची उत्सुकता लागली आहे.

https://www.instagram.com/p/Cekhf88PtMN/

माहितीनुसार, लग्नाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. ज्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले होते त्यांना लग्नाआधी विशेष कोड दिला होता. हा कोड दाखवल्यानंतरच लग्नामध्ये प्रवेश देण्यात येत होता. यांचा लग्नसोहळा चेन्नईतील महाबलीपुरम या ठिकाणी पार पडला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!