Share

पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याची नसीम खान यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Published On: 

मुंबई:  दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमती ५ आणि १० रुपयांनी कमी झाल्याने थोडा दिलासा मिळाला आहे. यानंतर आता भाजपनेही राज्य सरकारने इंधनाची दरवाढ कमी करण्याची मागणी लावून धरली आहे.

इंधनाचे दर कमी करण्याबाबत राज्य सरकार कोणतीही भूमिका घेत नसल्याचे चित्र दिसत आहे. भाजप नंतर आता इंधनाचे दर कमी करण्याबाबतच्या मागणीसाठी काँग्रेसनेही जोर लावून धरला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

congress latter

गेल्या काही महिन्यांपासून इंधनदरात झपाट्याने वाढ होत असून, देशातील जवळपास सर्व मोठ्या शहरांत पेट्रोलने शंभरी ओलांडली असून, डिझेलनेही नवा उच्चांक गाठला होता. यावरून नागरिकांच्या चिंतेत अधिकच भर पडली होती. त्यानंतर आता केंद्र सरकार पाठोपाठ राज्यसरकारने देखील इंधन दर कमी करावे हि मागणी सर्वत्र केली जात आहे.

माजी मंत्री व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी इंधन दर कपात मागणी करण्याविषयी सांगितले की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सर्वच सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. पंजाब व राजस्थान सरकारने ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलच्या करामध्ये कपात करून जनतेला दिलासा दिला आहे. त्यानुसारच राज्यातील जनतेच्या हितासासाठी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी करून दिलासा द्यावी, अशी मागणी आरिफ नसीम खान यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!