पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Abedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पुण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) , विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासह अनेक भाजपचे नेत्यांनी हजेरी लावली होती. सिम्बॉयसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला अभिवादन केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचे गुपित सांगितले आहे.
माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस आहे. व्हाया देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला सांगितले जाते की दिल्लीला जा आणि सुखी राहा. मी आदेश पाळला आणि भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात. मीही आदेश पाळला आणि आज मी सुखी आहे, असे नारायण राणेंनी म्हणाले आहेत.
महिन्याला पुण्यात येणारा माणूस आज चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातलं अंतर यांनी वाढवलं याला देवेंद्र फडणवीस कारणीभूत आहेत, असं राणेंनी म्हणताच फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून हात जोडले, आणि हे पाहून संपूर्ण सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर त्यांनी हातातले घड्याळ भाजपचे नाही, राष्ट्रवादीचे आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असा टोलाही यावेळी नारायण राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मिलिंद नार्वेकरांचे ट्विट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे’
- मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना?- नारायण राणे
- मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ ट्विटचे देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन
- भारताविरुद्धच्या पराभवावर न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली निराशा
- मुंबई, पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू
- सामनावीर ठरल्यानंतर मयंक अग्रवालने राहुल द्रविडबाबत केले मोठे भाष्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

