पुणे : शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आठवण करून दिली आहे. आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती. याबाबतचे ट्विट मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी केले आहे. मिलिंद नार्वेकरांच्या ट्विटवरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नार्वेकरांनी असं टि्वट करणं हे महाविकास आघाडीच्या पायाला सुरुंग लावणं आहे. महाविकास आघाडी धर्मनिरपेक्ष यावरच आहे ना ? अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन यावर तो मिनार उभा आहे. त्यांचे मातोश्रीशी काही बिनसलं का कळत नाही. कारण असं ट्विट करणं त्यांच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
मिलिंद नार्वेकर यांनी अशा प्रकारचे टि्वट केल्यानं त्यांचे अन् ‘मातोश्री’याच्यात काही बिनसलं आहे का, अशी शंका येते. मिलिंद नार्वेकरांनी आघाडी सरकारच्या मनोऱ्यालाच धक्का लावला आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
‘अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्वीट नार्वेकर यांनी केले आहे. त्यांच्या या ट्विटवरुन राजकारणात वाद उभा सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेना प्रमुख का? असा सवाल केला. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटचे समर्थन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ ट्विटचे देवेंद्र फडणवीसांकडून समर्थन
- भारताविरुद्धच्या पराभवावर न्यूझीलंडच्या कर्णधाराने व्यक्त केली निराशा
- मुंबई, पुण्यातील शाळा ‘या’ तारखेपासून होणार सुरू
- सामनावीर ठरल्यानंतर मयंक अग्रवालने राहुल द्रविडबाबत केले मोठे भाष्य
- दमदार विजयानंतर विराट कोहलीचे मोठे वक्तव्य


