पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr.Babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी पुण्यातील सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना मिलिंद नार्वेकर म्हणजे आत्ताचे नवे शिवसेनाप्रमुख का?असा खोचक टोला नारायण राणेंनी लगावला आहे.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी ६ डिसेंबर १९९२ रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आठवण करून दिली आहे. आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती. याबाबतचे ट्विट नार्वेकर केले असून त्यात ते म्हणाले आहेत की,’अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन.’ नार्वेकरांच्या या ट्विटवरुन राजकीय वर्तुळात नवा वाद सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे.
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) December 6, 2021
दरम्यान, फडणवीसांना या ट्विटसंदर्भात विचारण्यात आले असता ते म्हणाले की,’नार्वेकरांचं बरोबरच आहे. त्यात चुकीचं काय?’ एवढ्यात नारायण राणे म्हणाले, नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख ना? असे म्हणताच त्यावर पुढे काहीही न बोलता राणे निघून गेले. आपण सगळ्यात शेवटी बोलणार असल्याचा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
महत्वाच्या बातम्या
- ममता बॅनर्जी आल्या व महाराष्ट्रात वादळ निर्माण करून गेल्या- संजय राऊत
- चिंताजनक! राज्यात नव्या व्हेरिएंटने बाधित रुग्णसंख्या ८ वर
- येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळवणार- गुलाबराव पाटील
- ५० टक्के लसीकरण कोविडविरोधातील महत्वाचा टप्पा, मात्र ही गती कायम ठेवणे आवश्यक- नरेंद्र मोदी
- ‘ओमायक्रॉन’संबंधी केंद्र सरकारने कडक भूमिका घ्यायला हवी- अजित पवार


